गुलाब फुलांचा राजा
फांदीवर खेळतो
पांढरा शुभ्र मोगरा
त्याच्यावर जळतो
गुलाब म्हणतो मोगऱ्याला
बघ माझा सुंदर रंग...
करू नको माझी
शांतता भंग...
मोगरा बिचारा रडला
मनातल्या मनात कुढला...
देवाकडे गेला न्याय मागायला
सुंदर रंग मागायला...
देव म्हणाले मोगऱ्याला
रडू नको कुढू नको
तुला देतो विशेष सुगंध
लोक होतील बघ धुंद....
तेंव्हापासून पांढऱ्या फुलांना
मिळाला अनमोल सुगंध...
मोगरा म्हणाला गुलाबाला
सांगतो एक गोष्ट
रंगापेक्षा गंध श्रेष्ठ...
रूपापेक्षा गुण श्रेष्ठ...
मी संगिता गुलाब
पतीदेव मोगरा...
माझ्यासाठी सारे कष्ट...
जरी मी असले खाष्ट ,तरी
माझ्यावर होत नाहीत
कधीच रुष्ट...
संसारात उभारले
आनंदाचे तख्त...
भरतकुमारांचे नाव घेते
द्या आम्हाला आशीर्वाद फक्त...
सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.