सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सासू सून

सासू-सून

सासू म्हणते सुनेला
लवकर उठ सकाळी...
सून म्हणे बंद करा टकळी
नाहीतर पडेल खाली कवळी...

सुनेने केला हलवा
सुनेने केला शिरा,
नवरा म्हणतो बिचारा
खातो, जरा धीर धरा...

हक्क गाजवणारी
सासू सुनेची जोडी ...
माझा माझा करताना
नेहमी खोड्या काढी...

सासू सुनेचं भांडण
नेहमी एकच नंबरी
शेजाऱ्यांची लावालावी
समेटानंतर भरे शंभरी

सासू सुना असतात
एकाच माळेच्या मणी
एकावर एक वरचढ
माघार घेत नाही कुणी ....

संगिता भालसिंग

उखाणा

गुलाब फुलांचा राजा
फांदीवर खेळतो
पांढरा शुभ्र मोगरा
त्याच्यावर जळतो
गुलाब म्हणतो मोगऱ्याला
बघ माझा सुंदर रंग...
करू नको माझी
शांतता भंग...
मोगरा बिचारा रडला
मनातल्या मनात कुढला...
देवाकडे गेला न्याय मागायला
सुंदर रंग मागायला...

देव म्हणाले मोगऱ्याला
रडू नको कुढू नको
तुला देतो विशेष सुगंध
लोक होतील बघ धुंद....

तेंव्हापासून पांढऱ्या फुलांना
मिळाला अनमोल सुगंध...

मोगरा म्हणाला गुलाबाला
सांगतो एक गोष्ट
रंगापेक्षा गंध श्रेष्ठ...
रूपापेक्षा गुण श्रेष्ठ...

मी संगिता गुलाब
पतीदेव मोगरा...
माझ्यासाठी सारे कष्ट...
जरी मी असले खाष्ट ,तरी
माझ्यावर होत नाहीत
कधीच रुष्ट...

संसारात उभारले
आनंदाचे तख्त...
भरतकुमारांचे नाव घेते
द्या आम्हाला आशीर्वाद फक्त...

सौ.संगिता भालसिंग

उखाणा

उखाणा

01

काळजाचे पान करते
शब्द माझे प्राण करते
मांडते उखाणा आता
लेखणीला छान करते ...
भावनेचा दर्द भरते
या जिवाचे रान करते ...
वाचतांना सर्वांचे मी
ऐकण्याला कान करते
समज आहे थोडकीशी
लेखन थोडे सान करते ...
भरतकुमारचे नाव घेते
आदराने तुमचा मान करते...

02

अडवू नको वाहणाऱ्या या नदीला
केवढा हा भार झाला या पापणीला
गंधवाही भावनेला मोल आले कुस्करून हुंगताना पाकळीला
बंधनाचा फास शोभे या मनाला
ठेव जपून हृदयात या साखळीला
संकटांचा सामना ही खेळलेला
जिंकण्याची गाठ बांधू ओढणीला...
धावणाऱ्या पायवाटा संथ झाल्या
दे जरासा हात हाती सोबतीला...
ओळखीच्या वादलाशी भांडताना
नाही बचावले कातडीला ...
साथ जन्मी साथ होती खरी रे
भोवऱ्याशी सोडू नको तू साजणीला...
या नभाचे हुंदके ही पेलवेना
कंप आला काळजाच्या लेखणीला...
भरतकुमारचे नाव घेऊन
हात जोडून विनंती देवाला...
तूच दे खांदा सुखाने तिरडीला
या तुझ्या आधी निघाल्या पालखीला ...

Sangita Bhalsing

विडंबन गीत

मूळ गीत

Song: गाडी चालली घुंगराची
Artist: प्रल्हाद शिंदे

lyricist: साहेबराव कोकाटे
composer: मधुकर पाठक

गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची

पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची

दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची, वाट बाई डोंगराची

घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिसं करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची

समोर दिसतंय्‌ आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची, वाट बाई डोंगराची

*********************

जोडी कोंडली उंदराची,गाठ  आहे पिंजऱ्याची
जाड झडप नि दाराची, गाठ आहे पिंजऱ्याची

गोठ्याच्या दारात पडलेली बाज
गोणपाट आहे घरं हे माझं
मुलंबाळं सारी सुखात साजं
मिळे चवड गाजराची,गाठ आहे पिंजऱ्याची

पाठीवर फटकन बसतो रं झाडू
मालकीन दडवून ठेवते लाडू
टकल्याच्या रागाला कसं रं काढू
या खडूस मालकाची ,गाठ आहे पिंजऱ्याची

पुशीत मिश्या बसे मांजरी
कुत्र्याची गस्त सदा भो भो करी
जावं कसं बिळात माझ्या घरी
खोड हुशार सापाची,गाठ आहे पिंजऱ्याची

उरात होतंयं धडपड फार
कसंही वाटे व्हावं पसार
तुटे तुटे ना हे भक्कम दार
भिती आहे मरणाची,गाठ आहे पिंजऱ्याची

सौ.संगिता भालसिंग

विडंबन गीत

मूळ गीत
गीतकार-मधुसूदन कालेलकर
संगीत-राम कदम
स्वर- चंद्रशेखर गाडगिळ
चित्रपट-पारध
.....
अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंध आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी

.............विडंबन गीत......

कुकर खरवडे ती करपलेला भात
कणी तांदळाची जळून खाक झाली

उभी ओट्या पाशी झुके मान खाली
असे तांदळाचे डबे आज खाली
घासघासूनी थकून पार गेली

लोटून घेतले का दार बंगल्याचे
बिघडलेले बेत जरी जेवणाचे
नको हा रुसावा मध्य रात झाली

सौ.संगिता भालसिंग

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

बाहुली

🌻 बोलकी बाहुली 🌻

बोलकी बाहुली
नाव तिचे राणी
गाते सदा गाणी
गुणगुण ...

नाचरी बाहुली
तालसूर छान
हलविते मान
डुगडुग ...

हसरी बाहुली
खळी गालावर
हसु ओठावर
खुदुखुदु ...

उंचसे सैंडल
नाजुकशी चाल
टोपी गोल गोल
लालेलाल ...

कुरळे कुरळे
केस काळे काळे
घारे घारे डोळे
निळे निळे

सुंदरसा फ्रॉक
रंगीत झालर
उबदार स्वेटर
मऊमऊ ...

*******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०३ एप्रिल २०१६

Copyright

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

नाती

गजल

सावरूनी नाती जरा घ्या
पांगताना सावली

नाळ अशी तोडू नका हो
काळजाच्या आतली ...

जाग हवी राती जराशी
वादळाची सावली

काळ असा अवचित येतो
मांजराच्या पावली

देव कुठे भेटेल आता
वेदनेची काहिली

टाळकुट्या समजून घे रे
साधना नामातली

अपूर्ण

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...