मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

पापणी



भिजलेली पापणी
बोलू नाही शकत...
आसवांची करणी
तोलू नाही शकत...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री - गझल

गजल - मैत्री 




ओढ आहे वेगळी ही छान मैत्री
अमर नाते जीवनी ही शान मैत्री

त्या भितीचा स्पर्श नाही थोडकाही
संकटाला थोपवाया दान मैत्री

सूर्य आहे सोबतीला मार्ग दावी
वाकडी ना वाट डावी भान मैत्री

ओल आहे साठलेली या मनाशी
काळजाचे हे सुगीचे  रान मैत्री

बंध आहे रेशमाचे मलमली हे
भावनांनी मांडलेले ठाण मैत्री

प्रेम भरलेल्या सुरांनो साथ द्या रे
संगिताने गायलेले गान मैत्री

सौ.संगिता भालसिंग



गात्र

तू नको ठरवू आता,सखे
प्रेमास पात्र की अपात्र...

मिठीत येशील तेंव्हा कळेल
कशी पुलकित होतात गात्र...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

मैत्री

****     मैत्री   *****
🌹🌹🌹🌹🌹🌹

खूप जपावे लागते
मैत्रीच्या फुलाला ...
प्रेमाचे खतपाणी
घालावे त्याला ...

मैत्री म्हणजे असते 
जणू ऊंबराचे फुल ...
जणू विठ्ठलाच्या
चरणाची पावन धुल ...

न लागावा कधी
मत्सराचा वारा ...
अभिमाना पेक्षा
स्वाभिमान बरा ...

खरी मैत्री होणे
 अवघड असते
मैत्री देवाचे एक
सुंदर दान असते ...

रक्ताच्या नात्यात
स्वार्थ असतो
प्रेमाच्या नात्यात
स्वार्थ नसतो ...

मन दुखविने
सोपे असते
मन सांभाळणे
कठीण असते ...

विश्र्वास मैत्रीवर
खूप खूप असावा
अणि तो आपल्या
वर्तनात दिसावा ...

*************
सौ.संगिता भालसिंग

💐Happy friendship 💐


मैत्री

प्रश्न पड़े मनी
मैत्री चेहरयाशी
की विचाराशी ?
सांगेल का कुणी ?

विश्वास असावा खास
मान सन्मान असे त्यास...
सत्य असत्याचा नसे भास
ज्याने होईल मैत्री चा नास...

प्रा सौ संगिता भालसिंग
अहमदनगर

मैत्री (चारोळी)

मैत्री


मैत्री आणि व्यवहार
करू नये कधी एकत्र..

राहतील कायम सोबत
सोन्यासारखे मित्र...

Sangita Bhalsing

Ahilyanagar 

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

शब्द फुले

उगाच घेऊ नकोस
ओढून स्वतःवर ..
लिहिली नाहीत मी
शब्दफुले तुझ्यावर ...

Sangita B Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...