सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

प्रेम

द्वैत अद्वैत मिटणे

अमर प्रेमाचे वर्म

कधी कळेल जगाला ...?

प्रेमाला जात ना धर्म ...

*********************

प्रा. सौ.संगिता भालसिंग
15/02/16

प्रेम

प्रेम कवितेतील प्रेम
कुटुंबासाठी असतं ..
उगीच कोणी स्वतः वर
ओढुन खुश व्ह्ययचं नसतं ...

प्रेम कवितेतील
प्रेम नवरयासाठी असतं ...
कविच्या मनात दूसरे
कुणी-कुणीच्  नसतं ...

प्रेम कवितेतील प्रेम
मुलांसाठी असतं ...
प्रेम कविता करताना
मुलचं समोर दिसतं ..

प्रेमकविता वाचून छान
प्रतिसाद द्यायचा असतो
अणि स्वतः च्या कुटुंबा वर
खुप प्रेम करायचं असतं ..

आपलं प्रेम बाहेर
कधी वाटायचं नसतं ..
हे कायम लक्षात
ठेवायचं असतं ...

प्रेम कवितेतील प्रेम
नातेवाईक,शेजारी,मित्र
यांच्या वरही असतं
पण प्रेमा-प्रेमात फरक असतो

प्रेम हे केवल वयावर
अवलंबून नसतं ..
प्रेम लहान _थोर
सर्वांनीच करायचं असतं ..
...............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
15/2/15
.............................................................

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

माऊली

कंठाशी आले प्राण,उरले न त्राण

बाळा,थकले डोळे पाहून जा

वृद्ध माऊली घालते तुला आन

माझ्या भेटीस एकदा येऊन जा

**********************

प्रा. सौ.संगिता भालसिंग

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

माझे वाचन

🌹माझे वाचन🌹

🌷 तरुणांनो, हे तुमच्यासाठी 🌷

मला आवडलेले प्रा. दत्तात्रय ना. दुभाशी यांचे
तरुणांना मार्गदर्शक पुस्तक.
किंमत-150रु.
बलशाली युवा शक्तिचा सर्वत्र विजय
व्हावा,या सदहेतुने युवकांना मार्गदर्शन म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या ना
सर्व भावना, जबाबदारी पेलता येण्यासाठी त्याना जीवन मुल्य असावित, ध्येय ,प्रेरणा,
आदर्श हवे, त्यासाठी साधना हवी.
प्रभावी व्यक्तिमत्त्व असावे, यासाठी
लेखकाने मार्गदर्शन केले आहे
जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तैयारी
करत आहेत त्यानी जरूर हे पुस्तक
वाचावे ...तसे पाहता सर्वानीच वाचावे
असे हे एक मला भावलेले
पुस्तक आहे .
धन्यवाद

प्रा. सौ.संगिता भालसिंग

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

मैत्रीची वेल

मैत्रीची वेल
*************

मैत्रीची वेल
खूप नाजुक असते ...
तिला खूप खूप जपावे लागते ...
अगदी लहान बाळाला
आई जपते ना तसेच ...
ती वेल खूप कोमल असते
तिला प्रेमाचे पाणी अणि
सहवासाचे भरपूर प्रेमख़त
घालावे लागते... म्हणजे मग
तिला खूप बहर येतो ....
आनंद अणि सुखाची फुले फळे
भरपूर येतात ...
त्या फुला फळांचा मनसोक्त
आस्वाद घेता येतो ...अणि मग
आपले जीवन परिपूर्ण अणि
सुदृढ़ होते,धष्टपुष्ट,बलशाली होते...
जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचा
सहज सामना करता येतो
म्हणून मैत्रीची वेल खूप खूप खूप
जपावी लागते ....!!

Happy promise Day...
i promise to you....
जो पर्यंत आयुष्य आहे ....तोपर्यंत
मी आपली मैत्री निस्वार्थीपणे आणि जपून निभावणार....👏

सौ.संगिता भालसिंग

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

टेडी बिअर

🌷 टेडी बिअर 🌷

टेडी रे टेडी, तू
दिसतो किती छान ...?
घराघरात सर्वत्र तुला
सिंहासनाचे स्थान ...!!

सर्वांचा तू लाडका,
वाटे खूप हवाहवासा
मुले मात्र करतात तुझा
जीव खूप नकोनकोसा ...!!

पांढरी शुभ्र मऊ मऊ
गुबगुबीत तुझी कुशी
आरामात लोळायला
डोक्याखाली तूच उशी ...!!

हवे तसे तुझ्याशी खेळून
देतात कुठेही फेकून
सुंदर कपडे जातात
चिखल मातीने मळून ...!!

आईला येते तुझी किव
वाळत घालते धुवून
सोडविते त्रासातुन
तुला कपाटात ठेवून ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...