मैत्रीची वेल
*************
मैत्रीची वेल
खूप नाजुक असते ...
तिला खूप खूप जपावे लागते ...
अगदी लहान बाळाला
आई जपते ना तसेच ...
ती वेल खूप कोमल असते
तिला प्रेमाचे पाणी अणि
सहवासाचे भरपूर प्रेमख़त
घालावे लागते... म्हणजे मग
तिला खूप बहर येतो ....
आनंद अणि सुखाची फुले फळे
भरपूर येतात ...
त्या फुला फळांचा मनसोक्त
आस्वाद घेता येतो ...अणि मग
आपले जीवन परिपूर्ण अणि
सुदृढ़ होते,धष्टपुष्ट,बलशाली होते...
जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचा
सहज सामना करता येतो
म्हणून मैत्रीची वेल खूप खूप खूप
जपावी लागते ....!!
Happy promise Day...
i promise to you....
जो पर्यंत आयुष्य आहे ....तोपर्यंत
मी आपली मैत्री निस्वार्थीपणे आणि जपून निभावणार....👏
सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.