प्रेम कवितेतील प्रेम
कुटुंबासाठी असतं ..
उगीच कोणी स्वतः वर
ओढुन खुश व्ह्ययचं नसतं ...
प्रेम कवितेतील
प्रेम नवरयासाठी असतं ...
कविच्या मनात दूसरे
कुणी-कुणीच् नसतं ...
प्रेम कवितेतील प्रेम
मुलांसाठी असतं ...
प्रेम कविता करताना
मुलचं समोर दिसतं ..
प्रेमकविता वाचून छान
प्रतिसाद द्यायचा असतो
अणि स्वतः च्या कुटुंबा वर
खुप प्रेम करायचं असतं ..
आपलं प्रेम बाहेर
कधी वाटायचं नसतं ..
हे कायम लक्षात
ठेवायचं असतं ...
प्रेम कवितेतील प्रेम
नातेवाईक,शेजारी,मित्र
यांच्या वरही असतं
पण प्रेमा-प्रेमात फरक असतो
प्रेम हे केवल वयावर
अवलंबून नसतं ..
प्रेम लहान _थोर
सर्वांनीच करायचं असतं ..
...............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
15/2/15
.............................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.