वादळ
आण हासू चेहऱ्यावर टाळ वादळ
पापणीच्या आड थोडे पाळ वादळ...
पापणीच्या आड थोडे पाळ वादळ...
सैल झाला आसवांचा उंच झोका
भावनांच्या उंबऱ्यावर जाळ वादळ...
भावनांच्या उंबऱ्यावर जाळ वादळ...
ही गुलामी संपणारी का नसे रे
उत्तराला शोधतो हा काळ वादळ...
उत्तराला शोधतो हा काळ वादळ...
का सुखाची नाव डोले सागराशी
या जगाला तोंड देण्या चाळ वादळ...
या जगाला तोंड देण्या चाळ वादळ...
बांधण्याला या घराच्या चार भिंती
शांततेने काळजावर माळ वादळ...
शांततेने काळजावर माळ वादळ...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
15.11.18
अहमदनगर
15.11.18

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.