मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

भूगोल अभ्यासाचे महत्व

 ११ वी व १२ वी भूगोल अभ्यासाचे महत्त्व - 

भूगोल हा केवळ नकाशे, नद्या किंवा पर्वतांचा,दगडांचा विषय नसून मानव व निसर्ग यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारा महत्त्वाचा विषय आहे. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषय समजून अभ्यासणे अत्यंत उपयुक्त ठरते

शैक्षणिक दृष्टीने भूगोलाचे महत्त्व - 

भूगोल विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, विश्लेषण क्षमता व तर्कशुद्ध विचार विकसित होतो.आजच्या टेक्नॉलॉजी च्या जगात नकाशे, आकृत्या व उदाहरणांमुळे विषय समजायला सोपा जातो आणि बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते.

निसर्ग व पर्यावरणाची जाणीव - 

भूगोलाच्या अभ्यासातून हवामान बदल, जलसंधारण, मृदा संवर्धन, पर्यावरण रक्षण व संवर्धन ,वनसंवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळते. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होते.

वर्तमान घडामोडी समजण्यासाठी उपयुक्त - 

पूर, दुष्काळ, ज्वालामुखी,भूकंप, चक्रीवादळे, जागतिक तापमानवाढ, नैसर्गिक व मानवी आपत्ती अशा घटनांचे कारण व परिणाम समजून घेण्यासाठी भूगोल विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्तमान घडामोडी चांगल्या प्रकारे समजू शकतात. आपत्तीकाळात काय करावे किंवा करू नये याची माहिती कळते.

स्पर्धा परीक्षांसाठी आधार - 

MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनसेवा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयाला विशेष महत्त्व आहे. ११–१२ वी भूगोल हा पुढील अभ्यासाचा मजबूत पाया ठरतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत भूगोलाचे प्रश्न असतातच.

करिअरच्या संधी - 

भूगोल विषय घेऊन पुढे विद्यार्थी:

GIS व Remote Sensing तज्ञ

पर्यावरण तज्ञ

शहरी नियोजन (Urban Planning)

शिक्षक व प्राध्यापक

प्रशासकीय अधिकारी

अशा विविध क्षेत्रात करिअर करू शकतात.

दैनंदिन जीवनातील उपयोग - 

हवामान अंदाज, शेती नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, प्रवास व नकाशा वाचन यासाठी भूगोलाचे ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडते.


निष्कर्ष - 

११ वी व १२ वी भूगोलाचा अभ्यास हा निसर्ग समजून घेण्यासाठी, पर्यावरण जपण्यासाठी आणि भविष्याची तयारी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भूगोल विषय मन लावून व समजून अभ्यासणे गरजेचे आहे.


Sangita Bhalsing 
Ahilyanagar 
Maharashtra

अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व -


अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व - 

Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life
Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life


अर्थशास्त्र (Economics) हा फक्त केवळ पुस्तकातील विषय नाही, तर आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला विषय आहे. 

काही लोक गमतीने अर्थशास्त्राला व्यर्थशास्त्र असे म्हणतात.परंतु ते चूकच आहे.कारण अर्थशास्त्राने मानवी जीवन व्यापलेले आहे.

दैनंदिन जीवनात आपण प्रत्येकजण अर्थशास्त्रातील विविध नियमांचा वापर करतो.पण आपल्याला ते लक्षातही येत नाही.

१. पैशाचा वापर आणि बचत

अर्थशास्त्र शिकल्याने विद्यार्थ्यांना पैसे कसे खर्च करावे, बचत कशी करावी हे समजते.

उदाहरण: जेव्हा तुम्ही बाजारात काही खरेदी करता, तेव्हा तुम्हाला किंमत, गरज आणि खर्च याचा विचार करता येतो.

२. व्यवहारातील निर्णय घेणे

अर्थशास्त्र शिकल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. व्यवहार कौशल्य वाढते.

उदाहरण: कोणत्या उत्पादनावर पैसे खर्च करायचे, कोणते उद्योग सुरू करायचे, हे कसे ठरवायचे. उत्पादन कसे,किती,कुठे करायचे? नवीन उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करताना अर्थशास्त्राचा खूप फायदा होतो.

३. रोजगार आणि उद्योग

उद्योग, नोकरी, आर्थिक धोरण यांचा अभ्यास केल्याने भविष्यात करियर आणि व्यवसाय ठरवायला मदत होते.

उदाहरण: एखादी व्यक्ती व्यवसाय सुरू करणार आहे का, नोकरी करणार आहे का, हे अर्थशास्त्र समजल्यावर नीट ठरवता येते.

४. देश आणि समाजाचा अर्थ

देशातील आर्थिक धोरण, कर, उत्पादन, बचत आणि खर्च यांचा अर्थ समजतो. देशाची आर्थिक परिस्थिती समजते.

उदाहरण: पेट्रोलच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, तर त्या निर्णयांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे लक्षात येते.

५. भविष्याची योजना

अर्थशास्त्र शिकल्याने आपण आर्थिक दृष्टिकोनातून भविष्याची तयारी करू शकतो.

उदाहरण: शेतकरी पीक, उद्योगपती नफा, गृहकर्ज घेणे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ही सगळ्या गोष्टी नीट समजतात.

विविध आर्थिक योजना समजतात,त्याचा लाभ घेता येतो.

Bank, शेअर मार्केट चे व्यवहार करता येतात.

शेवटी सांगायचे तर,

अर्थशास्त्र फक्त अभ्यासासाठी नाही, तर जीवनात पैसे, निर्णय आणि समाज समजण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.

जितके लवकर मुलांना याची जाणीव होईल, तितकी त्यांची व्यावहारिक बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढेल.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

प्रश्नपत्रिका



21 मार्च 2023
बोर्ड प्रश्नपत्रिका 
विषय समाजशास्त्र

खालील लिंकवर पीडीएफ फाइल मिळेल.समाजशास्त्र 12 वी बोर्ड प्रश्नपत्रिका

मराठी व्याकरण अलंकार

मराठी व्याकरण 12 वी - अलंकार


 
अलंकार म्हणजे काय?
अलंकाराचे विविध प्रकार कोणते?
उप प्रकार कोणते?
अलंकारांची विविध उदाहरणे.
अलंकाराचा प्रकार कसा ओळखायचा?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील व्हिडिओ मध्ये मिळतील.
Chrom ब्राउझर वर खालील लिंक ओपन करा.

ही लिंक ओपन केल्यास सविस्तर माहिती मिळेल.
व्हिडिओ पाहून तुमच्या काही शंका, सूचना असल्यास कमेंट करून सांगा.
योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

Sangita Bhalsing 
Ahilyanagar,Maharashtra 

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

 मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

काव्यगुण 

काव्यगुण म्हणजे काय?

प्रकार कोणते?

विविध उदाहरणे.


https://youtu.be/OMowJUcXoh4


वर दिलेल्या यू ट्यूब व्हिडिओ ची लिंक क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.

व्हिडिओ पाहून तुमच्या काही शंका, सूचना असल्यास कमेंट करून सांगा.
योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

Sangita Bhalsing 
Ahilyanagar, Maharashtra 

मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

 मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

१) शब्दशक्ती 

शब्दशक्ती म्हणजे काय?

शब्दशक्तीचे प्रकार कोणते? 

शब्द शक्तीचे उदाहरणे.

खाली दिलेल्या यू ट्यूब व्हिडिओ ची लिंक क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.

https://youtu.be/xHjsxQd40gs

व्हिडिओ पाहून तुमच्या काही शंका, सूचना असल्यास कमेंट करून सांगा.
योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

Sangita Bhalsing 
Ahilyanagar, Maharashtra 


सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

मराठी व्याकरण - वाकप्रचार

मराठी व्याकरण - वाकप्रचार 

प्रश्न - खालील वाक्प्रचारांचा अर्थ दिलेल्या पर्यायातून ओळखा.

१) गर्भगळित होणे -

घाबरणे
राग येणे
त्रास होणे
पळून जाणे

उत्तर - घाबरणे

२) दूषण देणे - 

मार देणे
आरोप करणे
बक्षीस देणे
दान देणे

उत्तर - आरोप करणे

३) घमेंड असणे -

प्रेमळ असणे
श्रीमंत असणे
गर्व असणे
गरीब असणे

उत्तर - गर्व असणे

४) प्रौढी मिरवणे -

बढाई मारणे
भांडण करणे
वरात मिरवणे
वृद्ध असणे

उत्तर - बढाई मारणे

५) तोंड देणे -

वाद घालणे
मार देणे
तोंड येणे
सामना करणे

उत्तर - सामना करणे.

६) अनुकूलता असणे -

सुविधा असणे
पर्याय असणे
सुख असणे
दुःख असणे

उत्तर - सुविधा असणे.

७) दंड थोपटणे -

आव्हान देणे
आवाहन करणे
दंड मारणे
बैठक करणे

उत्तर - आव्हान देणे.

८) सज्ज असणे -

कष्टी असणे
तयार असणे
घराला गॅलरी असणे
लढाई करणे

उत्तर - तयार असणे.

९) दीर्घोद्योगी असणे -

सतत कार्य करणे
दीर्घायुषी असणे
काम करणे
कष्ट करणे

उत्तर - सतत कार्य करणे.

१०) लाखाची गोष्ट करणे - 

लाख रुपये असणे
गोष्ट सांगणे
महान कार्य करणे
लाखात एक असणे

उत्तर - महान कार्य करणे.


Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...