सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

शिक्षका तू वेडा कुंभार

ही माझी कविता आहे
मागील वर्षी केलेली

*****************

शिक्षका,तू वेडा कुंभार*

शाळेच्या बाकावरती देसी,
मुलांना आकार
शिक्षका,तू वेडा कुंभार...!!धृ!!

खडु,फळा अन् प्रश्न उतारा
तूच शिकविसी सर्व उत्तरा
सदगुणच मग,ये आकारा
तुझ्या मुलांच्या शिकवीण्याला
नसे अंत ना पार...
शिक्षका,तू वेडा कुंभार.....!!१!!

मुलामुलांचे रूप आगळे
प्रत्येकाचे गुण वेगळे
तुझ्याविना ते,कोणा न कळे
पाठी कुणाच्या पड़ते थाप
कुणा हाती छडीमार...
शिक्षका,तू वेडा कुंभार.....!!२!!

तूच घडविसी,तूच तुडविसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी
कळते यातून राष्ट्र घडवीसी
देउन ज्ञान, दूर करिसी
तयापुढील अंधार...
शिक्षका,तू वेडा कुंभार...!!३!!
*************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.०५/०९/१५
विशेष विनंती ...
कृपया ही रचना माझ्या नावासह
शेअर करावी
Dedicated to all respectable teachers in the universe.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲