माझी गजल २०
मोक्ष
खेळ दैवाचा कळेना
वेळ मॄत्युची टळेना
कोण मी हे शोधतांना
ही उत्तरे का जुळेना
रंगमंची मोहरे हे
देवपूजे का वळेना
देहभोगी मानवाच्या
वासना ही का जळेना
येरझाऱ्या ईहलोकी
मोक्ष वाटा का मिळेना
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
(गुगल गुरु)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.