शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

माझी गजल ४०

माझी गजल  ४०

वॄत्त  आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

लगाम

कंठात राम नाही नावात राम आहे
भोगात दास त्याचे जीणे हराम आहे

बोलू नकोस कडवट सांभाळ शब्द आता
पाळाच मौन आता जिव्हा लगाम आहे

खेळू नकोस आता एक्का तुझ्या मनाचा
खाशील मात आता राणी बदाम आहे

दाखू नकोस खोटा श्रीमंत आव आता
ध्यानात ठेव जीवन सारे छदाम आहे

नामात ध्यान कामाशी काम शोध आता
मोक्षास शोधतो तू येथेच शाम आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.२५/११/१६
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲