शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

माझी गजल ३९

माझी गजल ४०

वॄत्त मंजुघोषा

गालगागा गालगागा गालगागा

भूक आली पेटवाया चूल आता
काटक्यांची लागली चाहूल आता

कावळयाचा सोहळाही वाढतांना
जागले हे पेंगलेले मूल आता

भाकरीच्या दोन घासाशी लढा हा
वेदनांचे थांबलेले शूल आता

हस्तरेखा ही पुसूनी पार झाले
कष्टरंगी बांधलेले पूल आता

मोरपंखी पावसाळे बरसण्याला
या नशीबी टाक तू पाऊल आता

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
25/11/16
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲