गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

माझी गझल ३७

भुजंग प्रयात वॄत्त
लगागा लगागा लगागा लगागा
20 मात्रा
12 अक्षरे

तुला पाहते रे

कुठेही कधीही तुला पाहते रे
मनाचा फुलोरा तुला वाहते रे

तुझे गीत गाते लपूनी छपूनी
तुझ्या गंधकोषी अशी नाहते रे

तुझे नाम ओठी तुझी हाक कानी
नकोसा दुरावा असा साहते रे

तुझी वाट पाहून दारी अशी मी
गुलाबी हवेशी उभी राहते रे

मिळेना कसा थांग कोठे लपे तू
दुधारी मनालाच समजावते रे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Congratulations
spsfun.com
22/11/16

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲