माझी गजल
वॄत्त मंजुघोषा
गालगागा गालगागा गालगागा
सरी
बरसल्या आता सरी या छान वाटे
त्या नभाचे या भुईला दान वाटे...
त्या नभाचे या भुईला दान वाटे...
खेळ सृष्टीचा सदोदी भावणारा
मोरपंखी नाचणारे रान वाटे...
मोरपंखी नाचणारे रान वाटे...
नाहलेल्या या तरूची पालवी ही
सुंदरीचे डोलणारे कान वाटे...
सुंदरीचे डोलणारे कान वाटे...
सोबतीला गार वारा गात येई
प्रेमरंगी डुंबणारे गान वाटे...
प्रेमरंगी डुंबणारे गान वाटे...
घे भरूनी आज ओटी पावसाने
या कुशीला रोपणारे धान वाटे...
या कुशीला रोपणारे धान वाटे...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.२५/११/१६
अहमदनगर
दि.२५/११/१६
Copyright
spsfun.com
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.