१२ वी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
१२ वी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

मराठी निबंध - प्रयत्न हाच परमेश्वर

 

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी 

 मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा निबंध/लेख प्रकाशित.

🌷 प्रयत्न हाच परमेश्वर 🌷

शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा-अर्चा करन्यास बंदीची बातमी आज दूरदर्शनवर ऐकली ...अणि लगेचच मला

प्रयत्न हाच परमेश्वर - निबंध (मराठी लेख) इयत्ता 12 वी   मंगळवार दि.३१ जाने.२०१७ एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी " पुरवणी मधे माझा लेख प्रकाशित.


"प्रयत्नान्ति परमेश्वर " या अचूक अणि अजरामर सुवचनाची आठवण झाली....यशस्वी होण्यासाठी प्रयत्न अणि उत्तम कार्य करण्याची गरज आहे,धार्मिक कर्मकांड करण्याची नव्हे...!!या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगाची ही अत्यावश्यक गरज आहे.प्रगत देश आज चंद्र अणि मंगळावर निवास करण्यासाठी धडपडत आहेत अणि आपण मात्र धार्मिक बाबीला चिकटून आहोत.परदेशात विद्यार्थी रोबोट बनवन्यात मग्न आहेत अणि आपली मुले आरती करन्यात गुंग झाले आहेत.मग भारत कसा प्रगत बनणार? जागतिक स्पर्धेत कसा टिकाव धरणार? परमेश्वराची आळवणी करुन अभ्यास न करता यशकसे मिळणार? जाती धर्म उंबऱ्याच्या आतच असला पाहिजे.

श्रद्धा असावी पण डोळस....!!अंधश्रद्धा काय कामाची ? आपले दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम ,राष्ट्रपिता म.गांधी अणि इतर अनेक थोर महान व्यक्तिमत्व असलेल्यानी अथक प्रयत्नावर भर दिला आहे.रिलायंस कंपनीचे निर्माते धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर नोकरीला होते.गरीबीत जीवन कंठणारी व्यक्ती आपल्या योग्य प्रयातनांच्या जोरावर देशातील महान उदयोगपती ठरली.

"असाध्य ते साध्य सायास करीता" असे तुकाराम महाराज म्हणतात तर, संत रामदास म्हणतात,

" जो दुसऱ्यावरी विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला 

जो आपणची कष्टत गेला,तोचि भला...!!" सर्वच संतांचा असा उपदेश आहे.

"केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे"

दैवावर विसंबुन रहा ,असा उपदेश कोणीच केला नाही.

म्हणून सतत उत्तम कार्य करीत रहा, प्रयत्ना शिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. योग्य मार्गाने जाणाऱ्या ला नक्की यश मिळते हा विश्वास बाळगा.प्रसिद्ध प्रशासक किरण बेदी म्हणतात की, "माझ्या आयुष्याचे एक ब्रीद आहे,ते म्हणजे जगात अशक्य असे काहीच नाही, कोणतेही ध्येय अप्राप्य नसते, फ़क्त अतोनात असे अथक परिश्रम करावे लागतात"

संत रामदास म्हणतात, "म्हणोंन आळस सोडावा,यत्न साक्षेपे जोडावा"

आळस एक नंबर चा शत्रू आहे. चिकाटी ,उत्साह यांनी सतत काष्टाचा मार्ग अवलंब करा.यश मिळविण्या साठी कोणताही शार्ट कट नाही देवाला नवस करुन अणि तीर्थ क्षेत्री जाऊन किंवा प्रदक्षिणा करुन यशमिळेल याची खात्री नाही.

यशाचा मूलमंत्र म्हणजे फ़क्त कठोर परिश्रम....!!

ससा अणि कासव यांच्या गोष्टीतील कासवाची चिकाटी ,अविचल राहण्याची प्रवृत्ती धारण केल्यास नक्की यश मिळेल. अभ्यास न करता नवरात्र उत्सव काळात अनवानी चालून,उपवास करुन परीक्षेत यश कसे मिळणार.

सार्वजनिक उत्सव सर्वच वाईट आहेत असे नव्हे,पण वेळेचा अपव्यय

अणि इतर लोकांना त्रास होतो ,पैशाचा गैरवापर ही ध्यानात घेतले पाहिजे.


धार्मिक कार्य घराच्या आत करुन  सात्विक समाधान मिळू शकते याचे सार्वजनिक प्रदर्शन कशाला? देव भक्ती आजकल प्रदर्शनीय झालेली दिसून येते,खरा भक्तिभावहरवून गेलेला दिसतो. केवळ इच्छा नि संकल्प करुण उद्दिष्ट पूर्ण होत नाही, त्याला प्रयातनांची जोड़ द्यावी लागते.

आजच्या पिढी समोर आपण कोणते आदर्श ठेवत आहोत ,यांचा विचार केला पाहिजे. आजच्या तरुणाईला आपण खूप दोष देतो पण त्यांच्या समोर आपण कोणत्या चांगल्या बाबी मांडत आहोत का?

हे विचार वाचून कदाचित असे वाटेल, की मी नास्तिक आहे की काय? पण तसे नव्हे ...!! घराच्याउंबरयाच्या आत धार्मिक बाबी असाव्या ,अणि श्रद्धा डोळस असावी इतकेच माझे मत आहे.


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर/अहिल्यानगर, महाराष्ट्र 
Copyright


ब्लॉग पोस्ट/निबंध आवडल्यास नक्की शेअर करा.


शनिवार, २४ जानेवारी, २०२६

मराठी १२ वी (12th Marathi) – Best YouTube Playlist for Study & Learning

 12 वी मराठी (12th Marathi) – 
Best YouTube Playlist for Study & Learning

12 वी मराठी (12th Marathi) –     Best YouTube Playlist for Study & Learning


हा विभाग आपल्या Playlists म्हणजे काय, कोणत्या विषयासाठी आहेत (उदा. व्याकरण ,साहित्य, अभ्यास टिप्स) हे वाचकांना माहिती देतो.

“आपल्या विद्यार्थ्यांसाठी 11 वी मराठीचे  सर्व घटक, सर्व भाग, गद्य, पद्य, कथा साहित्य प्रकार, व्याकरण, उपयोजित मराठी YouTube प्लेलिस्ट मध्ये एकत्रित केले आहेत…”

Yoy tube channel वरिल video ची playlist कशी चेक करावी ? 

अगदी सोप्या भाषेत समजून घ्या.

सर्वात प्रथम मराठी विषयाचे पुस्तक आपल्या समोर ठेवा.

“YouTube playlist open करा.

क्रमाने videos पहा, 

महत्वाचे points, मुद्दे नोट करा, आणि नंतर Watch later मध्ये save करा” ✅

सर्व धडे,कविता,व्याकरण क्रमाने व्हिडिओ पहा.

एखादा मुद्दा समजला नाही तर 

व्हिडिओ पुन्हा पहा. तरीही न समजल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.

तुमच्या शंका असतील तर विचारू शकता.


खालील लिंक ओपन करा. मराठी १२ वी Marathi 12th 

Chrome browser मध्ये Link open करा.

https://www.youtube.com/playlist?list=PLmZ6hjoB2PwYQjbg87okWWTWYB2DTL5-P

१२  वी मराठी (12th Marathi) –   Best YouTube Playlist for Study & Learning

Study Tips


• 12 वी मराठी अभ्यास टिप्स

• Playlist वापरण्याचे फायदे

• YouTube कोर्स/टॉपिक्स कसे प्लॅन करावे?


ब्लॉग पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा.तसेच तुमच्या काही शंका, सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

त्याचप्रमाणे यू ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ आवडल्यास like comment share नक्की करा.


अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹 


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

वृक्षारोपण - काळाची गरज ! मराठी निबंध

 वृक्षारोपण - काळाची गरज ! मराठी निबंध 

✍️ निबंध (१२ वी बोर्ड परीक्षा साठी)

प्रस्तावना :

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात. झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. मानवाचे अस्तित्व झाडांशिवाय अशक्य आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व आज अधिक वाढले आहे. अविरतपणे ऑक्सिजन देण्याचे काम ते निस्वार्थीपणे करत असतात. त्यांच्यावर कुऱ्हाड चालवून मानवाने आपलेच नुकसान करून घेणे योग्य आहे का?

विद्यार्थी व शिक्षक वृक्षारोपण करताना – पर्यावरण संरक्षणाचा संदेश


मुख्य भाग :

आज वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांची नासधूस मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पाऊस कमी पडतो, तापमान वाढते आणि हवामानातील अनियमितता वाढत चालली आहे. या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे — वृक्षारोपण. 

झाडे आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पावसाचे प्रमाण टिकवतात, तसेच पक्षी, प्राणी यांना निवासस्थान देतात. प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे.

सरकार, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था सर्वांनी मिळून वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात.

परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की, वृक्षारोपण करणे यापेक्षाही महत्त्वाचे आहे त्याला जगवणे....!

उपसंहार :

झाडे म्हणजे आपल्या पृथ्वीचे अलंकार आहेत. झाडे लावणे हे फक्त कर्तव्य नाही, तर ते भविष्यातील पिढ्यांप्रती आपले देणे आहे.

“एक झाड – लाखो श्वास” ही भावना मनात ठेवून सर्वांनी वृक्षारोपण करावे.

अनेक लोक, संस्था वगैरे असे प्रयत्न नक्कीच करत आहेत ,पण ते अपुरे आहेत.

वृक्ष संवर्धन का गरजेचे आहे?

विकास हा निश्चितच व्हायला हवा पण त्याचबरोबर वृक्षांचे व परमेश्वराने निसर्ग रुपी  अनमोल ठेव्याचेही रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिमेंटचे जंगल बनवताना सहजीवनाची साखळी तोडण्याचे काम आज सर्वत्र सुरू आहे. एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीव, जंतू पशु, पक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो.

म्हणूनच "झाडे लावा, झाडे जगवा"

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...