मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध

 शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास ! मराठी निबंध 


शिस्त (कुटुंबात, समाजात, देशात) Marathi Essay 

मराठी निबंध शिस्त कुटुंब, समाज आणि देशात


प्रस्तावना

शिस्त म्हणजे नियम, मूल्ये , कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाळून वागण्याची सवय. शिस्त ही केवळ बाह्य बंधन नसून ती अंतःकरणातून स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. स्वातंत्र्य जितके आवश्यक आहे, तितकीच शिस्त देखील आवश्यक आहे.व्यक्तीपासून कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा पाया शिस्तीवरच उभा असतो.

१) कुटुंबात शिस्त

कुटुंब हे शिस्तीचे पहिले विद्यालय आहे. लहानपणी मिळालेल्या सवयी पुढील आयुष्य घडवतात. पालकांनी कुटुंबात शिस्तीचा संस्कार प्रथम केला पाहिजे.इथे आईची भूमिका अधिक महत्त्वाची आहे हे नाकारता येणार नाही.घराचे इंजिन म्हणून , दिशादर्शक म्हणून तिचे महत्व आहे. स्त्री पुरुष समानता या मूल्याची पायाभरणी तर कुटुंबातच झाली पाहिजे.

वेळेचे नियोजन : उठणे, अभ्यास, काम, विश्रांती यांचे वेळापत्रक.

संस्कार व मूल्ये : आदर, प्रामाणिकपणा, सचोटी , भूतदया,सहकार्य, संयम.

जबाबदारीची जाणीव : घरातील लहानमोठी कामे वाटून घेणे. मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक जबाबदार कुटुंबातच घडू शकतो.

शिस्तबद्ध कुटुंबात परस्पर प्रेम,विश्वास वाढतो, मतभेद कमी होतात आणि मुलांचे व्यक्तिमत्त्व सशक्त घडते. कुटुंबातील मतभेद मुलांना कमजोर बनवतात.

२) समाजात शिस्त

समाजातील शिस्त म्हणजे सार्वजनिक नियमांचे पालन आणि एकमेकांबद्दलची कर्तव्यभावना.

आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव असणे. सामाजिक ऋण फेडण्याचे भान असणं.

कायदे व नियम पाळणे : वाहतूक नियम, स्वच्छता, सार्वजनिक शिस्त. कायद्याचा आदर करणे.

सामाजिक सलोखा : जात-धर्म-पंथ न पाहता माणुसकी जपणे. मानवता धर्म मानून सामाजिक वर्तन करणे.

सहकार्य व सेवा : गरजूंस मदत, स्वयंसेवी उपक्रमांत सहभाग. इतरांच्या प्रति प्रेमाने आणि सहानुभूती पूर्वक वर्तन.

शिस्तबद्ध समाजात सुरक्षितता, सुव्यवस्था आणि विकासाची गती वाढते. व्यक्तिविकास झाला की देशाचा विकास होतो.

३) देशात शिस्त

देशपातळीवरील शिस्त ही राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. देशप्रेम, देशभक्ती या शब्दांचा खरा अर्थ मनाला भिडला पाहिजे.

संविधान व कायद्यांचा सन्मान : अधिकारांसोबत कर्तव्येही निभावणे. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून वर्तन आवश्यक आहे.

राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण : सार्वजनिक साधनसंपत्तीची काळजी.

कामातील प्रामाणिकपणा : प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. प्रामाणिकपणा हा जीवनाच्या सर्वच पातळीवर अविभाज्य भाग असला पाहिजे.

शिस्तबद्ध देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्ह ठरतो आणि प्रगतीकडे वेगाने वाटचाल करतो.


शिस्त नसल्याचे दुष्परिणाम

अव्यवस्था आणि अराजकता

सामाजिक तणाव व गुन्हेगारी, व्यसन 

विकासाला अडथळे, भ्रष्टाचार 

निष्कर्ष

शिस्त ही बंधन नसून स्वातंत्र्याचा योग्य वापर शिकवणारी शक्ती आहे. कुटुंबात रुजलेली शिस्त समाजात विस्तारते आणि समाजातील शिस्त देशाला बळकट करते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून शिस्तीची सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा, देशसेवा आहे. प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सैनिक बनू शकत नाही. पण आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे, देशसेवा म्हणून केले पाहिजे.


बोधवाक्य : शिस्त म्हणजे प्रगतीचा श्वास.


घर असो वा दार 
शिस्त हवी फार

Sangita Bhalsing 
Ahilyanagar Maharashtra 

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

मराठी १२ वी (12th Marathi) – Best YouTube Playlist for Study & Learning

 12 वी मराठी (12th Marathi) – 
Best YouTube Playlist for Study & Learning

12 वी मराठी (12th Marathi) –     Best YouTube Playlist for Study & Learning


हा विभाग आपल्या Playlists म्हणजे काय, कोणत्या विषयासाठी आहेत (उदा. व्याकरण ,साहित्य, अभ्यास टिप्स) हे वाचकांना माहिती देतो.

“आपल्या विद्यार्थ्यांसाठी 11 वी मराठीचे  सर्व घटक, सर्व भाग, गद्य, पद्य, कथा साहित्य प्रकार, व्याकरण, उपयोजित मराठी YouTube प्लेलिस्ट मध्ये एकत्रित केले आहेत…”

Yoy tube channel वरिल video ची playlist कशी चेक करावी ? 

अगदी सोप्या भाषेत समजून घ्या.

सर्वात प्रथम मराठी विषयाचे पुस्तक आपल्या समोर ठेवा.

“YouTube playlist open करा.

क्रमाने videos पहा, 

महत्वाचे points, मुद्दे नोट करा, आणि नंतर Watch later मध्ये save करा” ✅

सर्व धडे,कविता,व्याकरण क्रमाने व्हिडिओ पहा.

एखादा मुद्दा समजला नाही तर 

व्हिडिओ पुन्हा पहा. तरीही न समजल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.

तुमच्या शंका असतील तर विचारू शकता.


खालील लिंक ओपन करा. मराठी १२ वी Marathi 12th 

Chrome browser मध्ये Link open करा.

https://www.youtube.com/playlist?list=PLmZ6hjoB2PwYQjbg87okWWTWYB2DTL5-P

१२  वी मराठी (12th Marathi) –   Best YouTube Playlist for Study & Learning

Study Tips


• 12 वी मराठी अभ्यास टिप्स

• Playlist वापरण्याचे फायदे

• YouTube कोर्स/टॉपिक्स कसे प्लॅन करावे?


ब्लॉग पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा.तसेच तुमच्या काही शंका, सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

त्याचप्रमाणे यू ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ आवडल्यास like comment share नक्की करा.


अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹 


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

11 वी मराठी (11th Marathi) – Best YouTube Playlist for Study & Learning

 11 वी मराठी (11th Marathi) – 

Best YouTube Playlist for Study & Learning

हा विभाग आपल्या Playlists म्हणजे काय, कोणत्या विषयासाठी आहेत (उदा. ग्रॅमॅर, साहित्य, अभ्यास टिप्स) हे वाचकांना माहिती देतो.

“आपल्या विद्यार्थ्यांसाठी 11 वी मराठीचे सर्व सर्व घटक, सर्व भाग, गद्य, पद्य, नाटक साहित्य प्रकार, व्याकरण, उपयोजित मराठी YouTube प्लेलिस्ट मध्ये एकत्रित केले आहेत…”

खालील लिंक ओपन करा. Chrome browser मध्ये Link open करा.

https://www.youtube.com/playlist?list=PLmZ6hjoB2PwYK5BMLHhfPPaHZbhMT7bf0

११  वी मराठी (11th Marathi) –   Best YouTube Playlist for Study & Learning

Study Tips

• 11 वी मराठी अभ्यास टिप्स

• Playlist वापरण्याचे फायदे

• YouTube कोर्स/टॉपिक्स कसे प्लॅन करावे


Yoy tube channel वरिल video ची playlist कशी चेक करावी ? 

अगदी सोप्या भाषेत समजून घ्या.

सर्वात प्रथम मराठी विषयाचे पुस्तक आपल्या समोर ठेवा.

“YouTube playlist open करा.

क्रमाने videos पहा, 

महत्वाचे points, मुद्दे नोट करा, आणि नंतर Watch later मध्ये save करा” ✅

सर्व धडे,कविता,व्याकरण क्रमाने व्हिडिओ पहा.

एखादा मुद्दा समजला नाही तर 

व्हिडिओ पुन्हा पहा.

तरी समजले नाही तर.... तुमच्या शंका, सूचना कमेंट बॉक्स मध्ये लिहा.

योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹 

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

मराठी १२ वी - बोर्ड परीक्षा - निबंधलेखन - विषय यादी

 मराठी १२ वी - बोर्ड परीक्षा - निबंधलेखन  - विषय यादी 

इयत्ता १२ वी मराठी साठी परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेले निबंधाचे जास्तीतजास्त विषय प्रकारानुसार देत आहे .हे विषय अभ्यासासाठी, सरावासाठी आणि बोर्ड परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरतील.

इयत्ता 12 वी मराठी परीक्षेसाठी निबंध विषयांची संपूर्ण यादी


HSC Essay Topics Marathi


🔹 1) सामाजिक निबंध विषय

स्त्री सक्षमीकरण/महिला सबलीकरण 

वाढती बेरोजगारी – एक सामाजिक समस्या

वाढती महागाई/महागाईचा भस्मासूर 

बदलती कुटुंबव्यवस्था

वृद्धांचे प्रश्न/वाढते वृद्धाश्रम 

युवक आणि व्यसनाधीनता

मोबाईल – वरदान की शाप?

सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम

ग्रामीण व शहरी जीवनातील तफावत किंवा फरक 

शिक्षणाचे खाजगीकरण

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार 

महिलांची सुरक्षितता

बालकामगार समस्या

स्वच्छ भारत अभियान

पाणीटंचाई

लोकसंख्या वाढ – आव्हाने

भ्रष्टाचार

अपंग व्यक्तींचे प्रश्न

सायबर गुन्हे

लैंगिक समानता/स्त्री पुरुष समानता 

आरोग्य सेवा आणि समाज

स्टार्टअप इंडिया 


🔹 2) शैक्षणिक / विद्यार्थी विषय

विद्यार्थ्यांचे कर्तव्य

परीक्षेचे महत्त्व

स्पर्धा परीक्षा – संधी आणि आव्हाने

ऑनलाईन शिक्षण

शिक्षकांचे समाजातील स्थान

शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास

अभ्यास आणि खेळ यांचा समतोल

करिअर निवड – योग्य मार्गदर्शन

पुस्तकांचे महत्त्व/वाचाल तर वाचाल 

वाचनसंस्कृती

विज्ञान शिक्षणाची गरज

शाळा – माझे दुसरे घर

मूल्यशिक्षणाची गरज

विद्यार्थ्यांमधील स्पर्धा

अभ्यासात तंत्रज्ञानाचा वापर

ग्रंथ हेच गुरू


🔹 3) सांस्कृतिक / परंपरागत विषय

भारतीय संस्कृती

सण-उत्सवांचे महत्त्व

लोककला आणि लोकसंस्कृती

ग्रामीण संस्कृती

महाराष्ट्राचे लोकजीवन

वारकरी संप्रदाय

शिवरायांचे विचार

संत परंपरा

लोकसाहित्याचे महत्त्व

संयुक्त कुटुंब पद्धती

मराठी भाषा – आमची ओळख

पारंपरिक खेळ

लोकनृत्य व लोकगीत


🔹 4) पर्यावरण व निसर्ग विषय

पर्यावरण संरक्षण

वृक्षसंवर्धन

वाढते प्रदूषण

जलसंवर्धन

ग्लोबल वॉर्मिंग

नैसर्गिक आपत्ती

निसर्ग आणि मानव

जैवविविधता

पावसाचे महत्त्व

वनसंवर्धन

प्लास्टिक प्रदूषण

हरित क्रांती

वृक्षवल्ली आम्हा सोयरे 

सौर ऊर्जेचे महत्त्व 


🔹 5) तंत्रज्ञान व विज्ञान विषय

विज्ञानाची प्रगती

इंटरनेटचे फायदे व तोटे

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

डिजिटल इंडिया

स्मार्ट फोन संस्कृती

आधुनिक भारत

अंतराळ संशोधन

विज्ञान आणि मानवजीवन

रोबोटिक्स

ई-शासन

आधुनिक तंत्रज्ञान


🔹 6) नैतिक / वैचारिक विषय

वेळेचे महत्त्व

परिश्रमाचे महत्त्व

शिस्त – यशाची गुरुकिल्ली

आत्मविश्वास

यशाचे रहस्य

स्वावलंबन

सकारात्मक विचार

प्रामाणिकपणा

संयमाचे महत्त्व

कर्तव्य आणि अधिकार


🔹 7) व्यक्तिचित्रण / आदर्श व्यक्ती

माझा आदर्श शिक्षक

एक नमुना म्हणून खालील लिंक वर ओपन करून आदर्श निबंध पहा.

क्रोम ब्राउझर वर खालील लिंक ओपन करा.

https://youtu.be/EXtU0WKYNwU?si=pLROXgzG22-RaGS2

माझे आवडते लेखक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महात्मा गांधी

छत्रपती शिवाजी महाराज

सावित्रीबाई फुले

लोकमान्य टिळक

स्वामी विवेकानंद

थोर समाजसुधारक

माझी आई / वडील


🔹 8) आत्मकथनात्मक / अनुभवाधारित

माझा आवडता सण

माझा शाळेतील पहिला दिवस

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

सहलीचा अनुभव

पावसाळ्याचा एक दिवस

परीक्षेचा अनुभव

लॉकडाऊनचा अनुभव

माझे छंद

मी पाहिलेला अपघात

माझे ध्येय

पावसाळ्यातील एक दिवस 

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


🔹 9) कल्पनाविलास / सृजनशील/कल्पनात्मक 

जर मी पंतप्रधान असतो तर…

जर झाडे बोलू लागली तर…

माझे स्वप्नातील भारत

उद्याचा भारत

भविष्यकाळातील शिक्षण

एक दिवस मोबाईल बंद झाला तर…

जर पैसा नसता तर…

मी पाहिलेला आदर्श समाज

पडक्या किल्याचे आत्मवृत्त 

परीक्षा नसत्या तर

सूर्य उगवला नाही तर 

वर्तमानपत्रे नसती तर 

मी शिक्षक झालो/झाले तर 

मी मुख्याध्यापक झालो तर

मला लॉटरी लागली तर

मी शेतकरी बोलतोय 

मी वीर सैनिकाची पत्नी बोलतेय 

मी सैनिक बोलतोय

मी नदी बोलतेय 


ब्लॉग पोस्ट आवडल्यास ब्लॉग फॉलो करा.

तसेच तुमच्या काही शंका, सूचना असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहा.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

तोंडी/मौखिक परीक्षा इयत्ता 12 वी 20 गुण

 तोंडी/मौखिक परीक्षा इयत्ता 12 वी 20 गुण 

नमुना प्रश्नपत्रिका 

तयारीसाठी उपयुक्त टिप्स !

इयत्ता १२ वी मराठी मौखिक / तोंडी परीक्षा (२० गुण) ही विद्यार्थ्यांसाठी पैकीच्या पैकी 
गुण मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. योग्य तयारी, आत्मविश्वास आणि
योग्य मार्गदर्शन असल्यास पूर्ण गुण सहज मिळू शकतात.

इयत्ता १२ वी मराठी तोंडी / मौखिक परीक्षा २० गुण तयारी मार्गदर्शन ब्लॉग चित्र



दररोज मोठ्याने वाचनाचा सराव करा.
कविता भावार्थासह पाठ करा.
आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करा.
घाई न करता स्पष्ट व आत्मविश्वासाने बोला.
शिक्षक विचारतील त्या प्रश्नाला मुद्देसूद उत्तर द्या.
आत्मविश्वासाने भाषण करा.

नमुना प्रश्नपत्रिका तसेच
संपूर्ण मार्गदर्शनासाठी खालील व्हिडिओ पहा 👇

परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयार व्हा.
खालील लिंक ओपन करा. Chrome browser मध्ये Link open करा.

https://youtu.be/92apHTnPQgw


https://youtu.be/JsucGeJAalY



वरील व्हिडिओमध्ये १२ वी मराठी मौखिक परीक्षेचे स्वरूप,
गुणवाटप, नमुना प्रश्न आणि विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी
हे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.

मौखिक परीक्षेबाबत तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहा –
पुढील व्हिडिओत उत्तर दिले जाईल.


भविष्यात विद्यार्थी समाजात आत्मविश्वास पूर्वक जीवन जगू शकेल तसेच स्पर्धा परीक्षेत, नोकरी साठी मुलाखत देऊ शकेल, यशस्वी करिअर करू शकेल यासाठी तोंडी परीक्षा उपयुक्त ठरू शकते.

🗣️ मौखिक परीक्षा – तयारी कशी करावी?
१) मोठ्याने वाचनाचा सराव (खूप महत्त्वाचा)
रोज १०–१५ मिनिटे मोठ्याने वाचा.
शब्द स्पष्ट, उच्चार स्पष्ट,अडखळणे टाळा.
गद्य, कविता – दोन्हीचा सराव करा
✔️ उच्चार, आत्मविश्वास वाढतो
२) कविता – भावार्थासह पाठ करा
किमान २–३ कविता पूर्ण पाठ ठेवा
फक्त पाठांतर नको,
👉 कवितेचा आशय, कवी काय सांगतोय हे समजून घ्या
कविता म्हणताना भाव, थांबे, स्वर , लय, ताल लक्षात ठेवा
३) कवितेचा भावार्थ पाठ करा.
४) प्रश्नोत्तरांची तयारी करा.
खालील प्रश्नांची आधीच तयारी ठेवा 👇
तुम्हाला आवडलेला धडा कोणता? का?
मराठी भाषेचे महत्त्व काय?
तुम्हाला कोणती कविता आवडते? कारण?
तुमचा छंद / ध्येय काय?
✔️ उत्तर लहान, स्पष्ट, मुद्देसूद असावे.
५) आत्मविश्वास कसा वाढवायचा?
आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव
आई-वडील / मित्रांसमोर mock oral घ्या
चूक झाली तरी घाबरू नका.
👉 थांबा, श्वास घ्या, पुन्हा बोला
६) देहबोली (Body Language)
सरळ उभे / बसून बोला
शिक्षकांकडे पाहून बोला
हात, पाय,मान फार हालवू नका, स्थिर रहा.
चेहऱ्यावर साधा, आत्मविश्वासपूर्ण भाव ठेवा.
विचित्र हावभाव करू नका.
७) परीक्षेच्या दिवशी लक्षात ठेवायचे
✔️ स्वच्छ, नीटनेटके कपडे
✔️ आत्मविश्वास
✔️ घाई नाही
✔️ “मला येत नाही” म्हणण्यापेक्षा
👉 थोडं तरी सांगा
⭐ शिक्षकांना काय जास्त आवडते?
स्पष्ट उच्चार
मुद्देसूद उत्तर
आत्मविश्वास
मराठी भाषेवरील प्रेम
🔔 थोडक्यात मंत्र
“स्पष्ट बोला – घाबरू नका – समजून बोला”
इतकं केलंत तरी २० पैकी १८–२० गुण सहज मिळतात 👍 पैकीच्या पैकी गुण देखील मिळू शकतात.

अशाच शैक्षणिक मार्गदर्शनासाठी माझे यू ट्यूब चॅनल Subscribe करा आणि
हा लेख विद्यार्थ्यांना शेअर करा.

Sangita Bhalsing 
Ahilyanagar 
Maharashtra 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

बोरन्हाण

 बोरन्हाण

संक्रांती नंतर रथ सप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते.

संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत केले जाणारे लहान मुलांचे बोर न्हाण – पारंपरिक वेशात मुलं, फुले, बोर व तांदळाने सजलेला मराठी संस्कार


महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोर न्हाण करण्याची एक सुंदर, हळवी, भावपूर्ण आणि अर्थपूर्ण परंपरा आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील आजही ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते. किंबहुना , एक सण उत्सव म्हणून साजरा केला जातो.बदलत्या काळात स्वरूप थोडे बदलले असले, तरी या विधीमागील भावनिक, आरोग्यदायी आणि सांस्कृतिक मूल्य आजही तितकेच महत्त्वाचे आहे.

🌾 बोर न्हाण म्हणजे काय?

संक्रांतीनंतर नवीन पिकाचे धान्य, तिळगूळ, बोर, ऊस , विविध प्रकारच्या भाज्या वगैरे उपलब्ध होतात.या नव्या अन्नधान्याच्या साक्षीने लहान मुलांना तेल लावून, उबदार पाण्याने अंघोळ घालण्याचा जो विधी केला जातो. तसेच संध्याकाळी बाळाला  औक्षण केले जाते. तिळगुळ, बोर, मुरमुरे, बिस्किटे, चॉकलेट वगैरे खाऊ आठव्यात भरून बाळाच्या डोक्यावर सर्व सुवासिनी मिळून टाकतात.त्याला बोर न्हाण असे म्हणतात.

ही अंघोळ केवळ शारीरिक स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, ती संस्कार, संरक्षण आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे.


☀️ कधी करावे?


मकर संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत कधीही.

(सूर्योपासनेचा महत्त्वाचा दिवस)


या काळात सूर्य उत्तरायणात असतो. सूर्याची ऊब वाढू लागते, थंडी हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे लहान मुलांसाठी हा काळ आरोग्यदृष्ट्या योग्य मानला जातो.


🛁 कसे करावे बोर न्हाण?


पारंपरिक पद्धत:

सकाळी लवकर उठून लहान मुलाला तीळ किंवा खोबरेल तेलाने हलका मालीश,उबदार पाण्याने अंघोळ,अंघोळीनंतर साफ, उबदार कपडे,ओवाळून शुभेच्छा देणे

काही ठिकाणी:

बोर, ऊस, तिळगूळ हातात देणे, डोक्यावर टाकणं.

"लहान बाळ मोठं होवो" अशा शुभेच्छा.

श्रीकृष्णाची गाणी ही गातात.


🧴 यामागील आरोग्यदायी महत्व


तेलामुळे त्वचा मऊ व सुदृढ राहते

थंडीमुळे होणारे सर्दी, खोकला, कोरडी त्वचा यांपासून संरक्षण

मालिशमुळे रक्ताभिसरण सुधारते

अंघोळीनंतर मुलं शांत, प्रसन्न राहतात


🙏 धार्मिक व सांस्कृतिक महत्व.


सूर्यदेवाची उपासना हा या काळाचा मुख्य आधार आहे.

रथ सप्तमीला सूर्याच्या रथाची पूजा केली जाते

नव्या पिकाचा पहिला स्वीकार लहान बाळाकडून करवून घेणे म्हणजे समृद्धीचे स्वागत.

ही परंपरा निसर्गाशी नाते जोडणारी आहे.


🌱 जुन्या–नव्याचा संगम


आजच्या काळात मोठे धार्मिक विधी शक्य नसले तरी

घरच्या घरी, साध्या पद्धतीने स्वच्छता, प्रेम आणि जपणूक केंद्रस्थानी ठेवून बोर न्हाण करता येते.

परंपरेचा गाभा जपून, आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशी ही प्रथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हेच खरे संस्कार आहेत.


✨ निष्कर्ष


बोर न्हाण ही केवळ अंघोळ नसून, ती आई‑वडिलांचे प्रेम, आजी‑आजोबांचे आशीर्वाद आणि संस्कृतीची शिदोरी आहे. लहान बाळाच्या आयुष्यातील ही पहिली सणासुदीची ओळख, त्याला आपल्या मुळांशी जोडणारी ठरते.


परंपरा जपूया, अर्थ समजून जपूया, आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया. 🌼


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra

अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – कौटुंबिक मराठी चित्रपटावर एक नजर...

 अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – मराठी कौटुंबिक चित्रपटावर एक नजर...


मराठी सिनेमा नेहमीच आपल्या घरातील नाती, भावना आणि वास्तव साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडत आला आहे. हा चित्रपट त्याच परंपरेतला..... एक हसत-खेळत पण विचार करायला लावणारा कौटुंबिक सिनेमा आहे.

अगं अगं सूनबाई , काय म्हणता सासूबाई – मराठी कौटुंबिक चित्रपटावर एक नजर...


कथाविषय - " हसू आणि आसू "

या चित्रपटाची कथा सासू–सून या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि संवेदनशील नात्याभोवती फिरते. रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी, गैरसमज, अपेक्षा, टोमणे आणि त्यामागचं दडलेलं प्रेम या कथेतून उलगडत जातं. त्यामुळे कथा कृत्रिम न वाटता अगदी घरातीलच वाटते.

पूर्वार्ध सुखाचा आणि उत्तरार्ध दुःखाचा ! अशी चित्रपटाची मांडणी आहे.मात्र संकटात, दुःखात आपलीच माणसे आपली असतात. दुःखाच्या प्रसंगी आपल्या माणसाची ओळख होते. कौटुंबिक प्रेमाची बांधणी करणारा अतिशय संवेदनशील, उत्तम चित्रपट आहे.


सासू–सून नात्याचं वास्तव चित्रण.

चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सासू–सून नातं केवळ संघर्षाच्या चौकटीत न अडकवता त्यामधील भावनिक गुंतागुंत दाखवणं.

सासूबाई कधी कडक, कधी हुकमी तर कधी मनाने हळव्या दिसतात.

सूनसुद्धा केवळ सहन करणारी नसून, स्वतःचं मत ठामपणे मांडणारी, बदल स्वीकारणारी आधुनिक स्त्री म्हणून समोर येते.


अभिनय आणि संवाद

कलाकारांनी आपापल्या भूमिका अत्यंत नैसर्गिकपणे साकारल्या आहेत. संवाद घरगुती, ओळखीचे आणि अनेकदा हसू आणणारे आहेत. काही प्रसंगांत हेच संवाद मनाला भिडतात आणि डोळे पाणावतात.


दिग्दर्शन आणि मांडणी

दिग्दर्शकाने विनोद आणि भावना यांचा उत्तम समतोल साधला आहे. कथा कुठेही अतिनाट्यमय किंवा उपदेशात्मक होत नाही. हलक्याफुलक्या प्रसंगांतून गंभीर सामाजिक मुद्दे मांडण्याचं कौशल्य या चित्रपटात दिसून येतं.


सामाजिक संदेश

आजच्या बदलत्या काळात नात्यांमध्ये संवाद, समजून घेणं आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणं किती गरजेचं आहे, हा संदेश चित्रपट सहजपणे देतो. त्यामुळे हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विचार करायला लावतो.


निष्कर्ष

हा चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहण्यासारखा आहे. हसू, भावना आणि वास्तव यांचा सुंदर संगम असलेला हा सिनेमा मराठी प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटतो.

" हसू आणि आसू " दोन्ही डोळ्यात घेऊन थिएटर बाहेर येणारे प्रेक्षक.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...