कविता क्रमांक 07
----------------
🌻सखी🌻
सखे ग , कुठे हरवली तू ...?
कुठे कशी शोधु ग मी तुला
का माझा कंटाळा आला ...?
आवडे का तुला लपायला ...
करतेय विनवणी तुला
नको सोडुस कधी तू मला
करमेना सखी तुझ्याविना
एकटीचा जीव सुनासुना
तू असली की ,आनंदठेवा
जाऊ आवडत्या दूर गावा
वाजे सुरेल संगीत पावा
मागु हाच आशीर्वाद देवा
हिरव्या पानात नि रानात
रंगीत फुलात नि मुलात
अवकाशात नि सागरात
फिरले सदा तुझ्या शोधात
सहज सुचले विचारात
डोकावले जरा हृदयात
दिसली मला तू काळजात
बद्ध होती माझ्याच मनात
********************
सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.