मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल १७

माझी गजल १७

शृंखला

शृंखला तोडून ये तू
उंबरा मोडून ये तू

कैफ यावा भेटण्याला
लाजणे सोडून ये तू

भंगलेल्या आसमंती
आसवे कोंडून ये तू

टोचणाऱ्या वेदनांची
बंधने खोडून ये तू

अंतरंगी सांडलेले
चांदणे जोडून ये तू

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲