माझी गजल २२
मोळी
टाक शब्दा दान तू झोळीत आता
मांडते मी काव्य हे ओळीत आता
वेदनांच्या काटक्यांनी टोचतांना
बांधते मी भावना मोळीत आता
भावनेच्या कोंदणाने रंगलेल्या
अक्षरांनो या जरा टोळीत आता
या नितीच्या काव्यकुंजी चौथऱ्याशी
ना प्रवेशी वाकडया बोळीत आता
साहित्याच्या या मधाला साठवाया
मीच राणी खेळते पोळीत आता
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.