मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल १२

माझी गजल १२
नादार
का असे शेजार झाले
साहता बेजार झाले ...
वंचना ही जीवघेणी
अंतरंगी ठार झाले...
ओळखीचे सूर होते
गीत हे गंधार झाले...
भंगलेल्या काळजाशी
बोलणे आधार झाले...
गंधलेल्या पाकळयाना
घ्यावया नादार झाले...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲