माझी गजल १८
लेखणी
लेखणीला धार आहे
लेखना आधार आहे
साहित्याच्या मांडणीला
कौतुकेही फार आहे
वाचनाच्या संगतीने
खोललेले दार आहे
मंथनाच्या चिंतनाने
वेचलेले सार आहे
साचलेले मांडते मी
नीलकंठी हार आहे
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
(गुगल गुरु)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.