मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल २१

माझी गजल २१

श्रीरंग

कोवळा श्रीरंग आहे
सावळासा रंग आहे

रासलीला खेळतांना
गोकुळीच्या संग आहे

बासरीचे सूर मोही
बावरी ही दंग आहे

सोडणारी हात नाही
बांधलेला चंग आहे

ईहलोकी भावनेचे
केवढे वादंग आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲