माझी गजल २३
कापूर
शब्द माझे सूर झाले
गावया आतूर झाले
वाहणाऱ्या वेदनेला
साज देता पूर झाले
भावनांना वादळाने
साथ देता दूर झाले
सैरभैरी चांदणीच्या
हृदयी काहूर झाले
देहभोगी वाहिलेल्या
जाळता कापूर झाले
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.