माझी गजल १४
रेशमी पंखात
चौकटीच्या आत आहे
चांदण्यांनी न्हात आहे
भैरवीने भारलेले
गोड गीत गात आहे
देहगंधी फासलेल्या
चंदनी वासात आहे
कोरलेल्या कुंकवाने
रंगलेले हात आहे
साजनाच्या संगतीने
रेशमी पंखात आहे
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.