🌻 जाता पंढरीत 🌻
जाता पंढरीत
अमृताचा ठेवा
वाटे हवा हवा
संजीवनी ...
चंद्रभागा तिरी
विठुची पंढरी
आले वारकरी
दर्शनाला ....
विठुचे भजन
कीर्तनात दंग
अभंगाला रंग
पंढरीत ....
आनंदले मन
पाहुनीया मुख
हरवली भूक
देहभान ....
सान थोर सारे
चरण स्पर्शती
आनंदे हर्षती
वारकरी ....
*****************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
24 मार्च 2016
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.