एकमत वर्तमान पत्रात " साक्षी "
पुरवणीमधे आज दि.१५/०३/१६
प्रकाशित झाली .
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रेमफुला
रंग-रंगुल्या सान-सानुल्या
प्रेम फुला रे प्रेम फुला
रंग प्रेमाचे किती सांगू तुला ?
आई-बाप,बंधू-भगिनीचा
कर आदर,विसरु नकोस त्याना
रंग प्रेमाचा त्यांच्या मायेला ...
गणगोत मित्र परिवाराचा
बन आधार, विसरु नकोस त्याना
रंग प्रेमाचा त्यांच्या स्नेहाला ...
गांव,शहर अन प्रिय देशाचा
कर कदर,विसरु नकोस त्याना
रंग प्रेमाचा त्यांच्या भक्तिला ...
प्राणी,पशु-पक्षी,वृक्ष-वेलीला
आण बहर,विसरु नकोस त्याना
रंग प्रेमाचा त्यांच्या भुतदयेला...
प्रेम फुला रे , प्रेम फुला
नवरंगात रंगून घे स्वतः ला
विसरु नकोस नवरसाला ...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
...प्रा.सौ.संगिता भालसिंग
9/2/15
spsfun.com
........................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.