गुरुवार, १० मार्च, २०१६

आई बाप

प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....
1
बाप म्हणे लेकी
हरभऱ्याची डाळ
जाशील परघरा
होईल तुझी राळ •••
•••••••••••••••
2
बाप म्हणे लेकी
खडी साखरेचा खडा
जाशील परघरा
जीव होईल थोडा थोडा
•••••••••••••
3
बाप अणि लेक
जरी अलगुज नाते
लेकीच्या माहेरसाठी
माय सासरी नांदते ....
•••••••••••
4
आई अणि बाप
देव्हा ऱ्या चे देव
सेवा करा त्यांची
नसे कोणाचे भेव ...
••...••••••••
5
सागरा रे बापा
नको मारू बढाई
तुझ्या पाण्याला नाही
तीळ मात्र गोडाई ...
•••••••••
6

आई माझी तरु
चुका घाली पोटी
बाप माझा तारु
बळ मनगटी
•••••••••••••••
7
बापाची लाडकी
लेक ती चांदणी
माऊली ठेविते
हृदयी कोंदणी
•••••••••••••
8
आई अणि बाप
शंकर पार्वती
कष्टाच्या मळाने
बाळ घडविती ...
••••••••••••••••
9
फाटके कपडे
बाप ते घालतो
मुलांच्या यशाची
कमान चढतो
•••••••••••••
10
आई म्हणू जाता
ओठ ते अस्पर्श
बाप म्हणू जाता
गोड ओठ स्पर्श
••••••••••••••••
11
संसाराचा रथ
आई बाप चाक
लेकुरे बसली
दिसे लई झ्याक ...
•••••••••••••
12
बापाच्या मायेला
उपमाच नाही
भरविण्या पोट
फिरे दिशा दाही ...
••••••••••••
13
आई बाप प्रेम
संसार फुलतो
आई बाप वाद
संसार उलतो ...
•••••••••
14
लगनाला आली
लेक ग लाडाची
झोप ग येईना
बापाला धडाची ....
•••••••••••••••
15
जावई पाहुणा
बापाला उल्हास
भरून तो देई
पाण्याचा गल्लास ...
••••••••
16
बाळ खांदयावर
बाप जग दावी
ठेवा अभिमान
नका देऊ शिवी .....
**************
17
बापाचे काळीज
नवनीत भासे ...
आजारी बाळाला
मांडीचे ग उसे ...
***********
18
खोडकर छंद
पोरांचा गलका
बाप पाही लीला
शिण होई हलका
***********
19
आई बापा विना
पोरके ते पोर
मुखावर दिसे
जगण्याचा घोर
************
20
आई तो ईकार
बाप तो आकार
बाळाचे जीवन
करिती साकार
**********
सौ.संगिता भालसिंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲