शनिवार, १२ मार्च, २०१६

एक नातं जिव्हाळ्याचे

प्रथम क्रमांक प्राप्त कविता

प्रथम क्रमांक विजेते...... प्रा.संगिता भालसिंग  एक नातं जिव्हाळयाचं
************************
कचऱ्यात फेकलेला एक
अनौरस कोवळा जीव तू ...
निपुत्रिक निराधार एक
गरीब विधवा मी ........

पाहिले दृश्य गाभडलेले
काळीज हळहळले ....
व्यवहारी विचार सोडले
अन हृदयाशी घट्ट धरले ....

धीर कुठला ?प्रेमपान्हाच फुटला
केविलवाना सुर हळूच थांबला
तुझे नि माझे नाते जडले
अनामिक शब्दांच्या पलिकडले..

ओसाड वाळवंटातील
लाभली सुखद हिरवळ
सुगंधरूपी पान कमळ
कस्तूरिचा जणू दरवळ ....

कोण कुठला शापित तू ?
जात धर्म पंथ कोणता ?
पण एक नातं जिव्हाळयाच
जीवनातील सुख समाधानाच ...
.......................................
.प्रा.सौ.संगिता भालसिंग
2/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲