गुरुवार, १० मार्च, २०१६

शब्दभाव

स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त

बसलोय विचारात
दैनंदिनी घेऊन ....
पाहतो काहीतरी
नवीन लिहून ....

आठवण येतेय तिची
राहून-राहून ....
भावना उकळत आहेत
अधुन-मधून ....

विनवणी करतोय
गोड शब्दातुन....
मन तिचे रीझवतोय
प्रेम भावना ओतून ....

पण शब्द बसलेत
जरा लपून ,रुसुन ....
पाहतो जरा त्यांचा
पक्का रुसवा काढून ....

भावनांची लाडीगोडी
शब्दाला लावून ....
घडवितो छान भेट
सुंदर काव्यातून ....

...............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
6/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲