सोमवार, १४ मार्च, २०१६

प्रवास

वेड शब्दांचे समूह
🌻🌻🌻🌻🌻

द्वितीय क्रमांक प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷

01
माती खेळुन -पिळुन घाम गाळणारा मी
निसर्गाशी झुंजत कितीक जीव
पोसनारा मी
संसारतापे त्रासुन स्वतः चा जीव
घेतला
अणि माझा प्रवास संपून गेला
02
माता पित्याच्या प्रेमाचा
अंकुर मी उदरात रूजलेला
शंकेची पाल जाई दवाखान्याला
घाला आला अन गर्भ खुडला
अणि माझा प्रवास संपून गेला
03
जीवाला जीव भेटला जीव लागला
जीव वेडावला मम जीव धुंदावला
अचानक जीव उलटला पालटला
अणि माझा प्रवास संपून गेला
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
प्रा. सौ.संगिता भालसिंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲