गुरुवार, १० मार्च, २०१६

मनीचे गुज

* कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त *
...............................................................
तू यावेस म्हणून
डोळे तरसतात
अन,तू गेलास की
डोळे बरसतात
वाजेल फोन म्हणून
कान आतुरतात...
आवाज तुझा ऐकला की
भावना बहरतात ...
गाल आरक्त होतात
रोमांच शहारे येतात ..
कोणी पाहत तर नाही न
म्हणून मागे-पुढे पाहते
काय बोलू ? कसे बोलू ?
किती किती बोलू ?
ते ही कळेना .....
मनी चे गुज सांगू
तरी किती ?
किती जागविल्या
दिन अन राती ....
...............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
1/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲