🌹 शपथ 🌹
नको मजला ते
धर्म,जात, पंथ ...
रक्तरंजीत रवंथ ...
नको व्रत वैकल्ये
नेमनियम जटिल ...
बेगडी अन् कुटिल ...
नको फुकाची सक्ती
अंधश्रद्धेची युक्ती ...
अन् भयाची भक्ती ...
माझी शपथ ....
फ़क्त मानवतेची ....
चराचर सृष्टीची ...
माऊलीने मगितलेल्या
वैश्विक पसायदानाची ...
गीतेतील ज्ञानाची ...
*******************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
१७/०३/१६
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.