प्रथम क्रमांक प्राप्त रचना ..
🌻गावची जत्रा अणि भानगडी १७🌻
***************************
एक गांव बारा भानगडी
म्हंण व्हते खरी
जव्हा येते दारी
गावची जत्रा ................
पै-पाव्हणे गडी-गुड़ी
येत्यात घरो घरी
मज्याच् मज्या सारी
गावची जत्रा ..................
तळ्या-मळयात गोष्टी
सुगीची ती सृष्टी
पैसा येई कनवटी
गावची जत्रा .............
कपडे-लत्ते गाड़ी-बीड़ी
खरेदीची गम्मतच न्यारी
दुष्काळात करी
गावची जत्रा ..............
देवाला निवेद-नार्योळ
अणि नवसाची कवळ
रण रण उन्हाची झळ
गावची जत्रा ..............
पोरा-पोरींची लगबग
डोळ्याची भाषा बग
रंगेल पिरेम रंग
गावची जत्रा ...............
गावची जत्रा अन् भानगडी सत्रा
वरिसभर आनंद मित्रा
बांधी एक सूत्रा
गावची जत्रा ..................
************************
सौ.संगिता भालसिंग
3/4/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.