लोकमन वर्तमान पत्रात प्रकाशित रचना
दि.२६ मार्च २०१६
वसंत ऋतू
शिशिर गेला , वसंत आला
ऋतुराज म्हणतात त्याला ...
पहा आम्रतरु बहरला
धुंदगंध आंबे मोहराला ...
कंठ फुटे गान कोकिळेला
ताल कर्णमधुर गाण्याला ...
नवती आली, पानापानाला
सुंदरता हिरव्या रंगाला ...
किलबिल पक्षी सावलीला
नवरूप आले धरतीला ...
आनंदाचे उधाण मनाला
चला,नववर्ष स्वागताला ...
तोरण बांधू घरादाराला
रंगीत नववस्त्र गुढीला ...
देऊ आमंत्रण होलिकेला
दुष्ट परंपरा जाळायला ...
जुन्या नव्याची सांगड घाला
चला,वसंतात रंगायला ...
**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
११/०२/१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.