शनिवार, १२ मार्च, २०१६

जगी भीमराव एकच राजा

धम्मविचार पुरस्कार प्राप्त

1
भीमा रामजीच्या पोटी जन्मले
चौदाव्या रत्नाने केली देशपूजा ...
झाले बहु,होतील बहु,पण
जगी भिमराव एकच राजा ...
***********************
2
अस्पृश्यता गरिबीशी झुंजत
विदेश शिक्षणी पोटाला सजा ..
कष्टाने गाठी संविधान सभा
जगी भिमराव एकच राजा ...
************************
सौ.संगिता भालसिंग
13/4/15
3
रमेचा पती,यशवंताचा पिता
कर्तव्य तत्पर,न करी मजा ...
गगनभरारी,पाय जमिनीवरी
जगी भिमराव एकच राजा ...
***********************
सौ.संगिता भालसिंग

4
दूर करण्या मानवी विषमता
हिंदू कोड बिलाचा गाजावाजा ...
अपयश येऊनही खंबीर असा
जगी भिमराव एकच राजा ...
************************
सौ.संगिता भालसिंग
5
अस्पृश्य जातीत जन्मलो मी
हिंदू म्हणून न मरण्याची ध्वजा
अशी हिंमत नसे कुणाची, असा
जगी भिमराव एकच राजा ..
**************************
सौ.संगिता भालसिंग

6
घटनेचा शिल्पकार अभ्यासू
सख्त नियमात बांधली प्रजा
राम राज्याचे स्वप्न पाही,असा
जगी भिमराव एकच राजा ..
************************
सौ.संगिता भालसिंग
7
स्त्रीशिक्षणाचा खरा कैवारी तू
तुला प्रथम नमस्कार माझा
वाटा दाविल्या ज्ञानाच्या,असा
जगी भिमराव एकच राजा ..
************************
सौ.संगिता भालसिंग
8
सिंहासम भीमगर्जना करी
नसे सहारा अस्पृश्यांना दुजा
समर्पण दलित उद्धारा असा
जगी भिमराव एकच राजा ...
***********************

9
तव्याचा जाय बुरसा मग
होई आरसा,म्हणे बाबा माझा
ज्ञानप्रकाश प्रतिबिंब दाखवी
जगी भिमराव एकच राजा
************************
सौ.संगिता भालसिंग

10
अंगीकारा बाबांचे विचार
नको हार फुले अन् पूजा
आचार विचार गुंफण करी
जगी भिमराव एकच राजा
**********************
सौ.संगिता भालसिंग
14/4/15
11
शिक्षण वघिणीच्या दुधानं
धष्ट पुष्ट झाला माझा राजा
ज्ञानाची गंगा वाटत सुटला
जगी भिमराव एकच राजा ..
**********************

सौ . संगिता भालसिंग
14 एप्रिल 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲